Friday, May 7, 2010

माझी हरहुन्नरी आई


सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.
तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच.
अन कुटुंबातील जवळ्जवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले.
भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या.
पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाने दोर्‍याची बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल.
१९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात.
याच विणकामाच्या नमुन्यांचे काही फोटो इथे टाकते आहे.
आणि हे सर्व चालू असताना टि. व्ही वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. अन ही सुडोकुही साधी नाहीत. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात; ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.
तिच्यावर एक सी. डी. ही मी तयार केली आहे, मराठी चॅनल्सकडे ती पाठवली होती, परंतु ओळखी नसल्याने त्याचा पाठपुरावा मला घेता आला नाही. येथे कोणाला तिचे काम आवडले तर कृपया मला मदत कराल ? केवळ तिचे हे प्रचंड काम लोकांपुढे यावे हाच दृष्टिकोन आहे. त्यात व्यावसाईक हितसंबंध नाहीत, ना तिचे, ना माझे.
असो.
आता तिच्या कामाचे काही फोटो-
हा गणपती विणलेला दाराचा पडदा
A1.jpg
ही काही डबलबेडशीट्स
A2.jpg
A3.jpg
A4.jpg
A5.jpg
A7.jpg
हा ५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल
A6.jpg
A10.jpg
अन हा ६ बाय ४ फुटी टेबलासाठीचा टेबलक्लॉथ
A11.jpg
माझ्या मुलाला गाड्या अन वाहनांचे फार वेड. म्हणून त्याच्या या आजीने त्याच्या खोलीच्या खिडकीला हा पडदा विणला
A8.jpg
अन हा दाराचा पडदा. कमानी खाली नाचणारे मोर
A9.jpg
अन ही माझी आई स्मित
A12.jpg
----------------------------------------------------------------------------------------------


6 comments:

  1. Today I saw this write-up about Rekha Kaki, it has all that I knew about her and more. I can suggest a TV channel which can air her accomplishments. It is SAM Marathi. They interview "Mulkhavegali Maanase".

    ReplyDelete
  2. ताई, क्रोशाचं हे विणकाम पाहून मी थक्क झाले. इथे एक रुमाल विणताना जिथे चिकाटी आणि संयमाची कसोटी लागते तिथे रेखामावशींनी बेटशीट्स विणलीत? तीही डबलबेडशीट्स... आणि ३२! खरंच खूप ग्रेट आहेत त्या! मला त्या करतात त्यातलं एक टक्का जरी करता आलं, तर स्वत:ला धन्य समजेन मी! या कामासाठी किती चिकाटी लागते याची पूर्ण कल्पना आहे मला पण त्यांच्या वयाच्या व्यक्तीने इतकी चिकाटी ठेवून एवढे मोठेमोठे प्रोजेक्ट्स पूर्ण करणं ही खरंच उल्लेखनीय गोष्ट आहे. तू त्यांच्या सी.डी. बद्दल लिहिलं आहेस. त्या विषयी जर मला काही कळलं तर इथेच कळवेन. तुला आणि रेखा मावशींना खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. कांचनशी सहमत. काय सुंदर विणलेय सारे. अप्रतिमच!

    ReplyDelete
  4. धन्यवाद भानस :)

    ReplyDelete